बंद
    • जिल्हा व सत्र न्यायालय सिंधुदुर्ग

      जिल्हा व सत्र न्यायालय सिंधुदुर्ग

    ताज्या बातम्या

    जिल्हा न्यायायलयाबद्दल

    सिंधुदुर्ग जिल्हा हा कोंकण प्रदेशाचा दक्षिणेकडील भाग असून, तो अरबी समुद्र आणि सहयाद्री पर्वतरांगाच्या मध्ये वसलेला आहे. दिनांक १ मे १९८१ रोजी मुळ रत्नागिरी जिल्हयापासून कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, मालवण, कणकवली व देवगड हे ६ तालुके वेगळे करुन स्वतंत्र सिंधुदुर्ग जिल्हा स्थापन करणेत आला. नंतरचे दोन तालुके म्हणजे वैभववाडी आणि दोडामार्ग हे सिंधुदुर्ग जिल्हयाला जोडले गेले. त्याप्रमाणे सध्या सिंधुदुर्ग जिल्हयात एकुण ८ तालुके आहेत. या जिल्हयाची उत्तर - दक्षिण सरासरी लांबी सुमारे १३० किलोमिटर असून, पूर्व - पश्चिम रुंदी ४० कि.मी. आहे.

    सिंधुदुर्ग जिल्हयाच्या पूर्वेला कोल्हापूर जिल्हा आहे. उत्तरेला रत्नागिरी जिल्हा आहे, दक्षिणेला गोवा राज्य असून, पश्चिमेला अरबी समुद्र आहे. सिंधुदुर्ग जिल्हयाला १२७ कि.मी. एवढया लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. पूर्वेला सहयाद्री पर्वताच्या रांगा आहेत. या पर्वत रांगेत करुळ, फोंडा, आंबोली व भुईबावडा असे ४ मोठे घाट आहेत.

    जिल्हा व सत्र न्यायालय, सिंधुदुर्गची स्थापना दिनांक २७ जानेवारी १९९७ रोजी झाली. ओरोस हे कुडाळ तालुक्यातील मध्यवर्ती गाव असून ते जिल्हा मुख्यालय म्हणून निवडलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्हयाची स्थापना १९८१ साली झाली असली तरी या जिल्हयासाठी स्वतंत्र जिल्हा व सत्र न्यायालय वरील दिनांकापासून सुरु झाले. मुख्यालयाच्या मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा न्यायालय व इतर न्यायालयांसाठी स्वतंत्र सुंदर इमारत बांधणेत आलेली आहे. सदर इमारतीमध्ये ९ स्वतंत्र न्यायालयांसाठी तरतुद करणेत आलेली आहे.

    दिनांक २५ जानेवारी १९९७ रोजी नविन[...]

    अधिक वाचा
    मुख्य न्यायमूर्ती
    मुख्य न्यायमूर्ती सन्माननिय मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय
    Justice Shri N R Borkar
    प्रशासकीय न्यायाधीश सन्माननिय श्री. एन आर.बोरकर
    PDJ_Sir
    प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सिंधुदुर्ग श्री. एच. बी. गायकवाड

    ई- न्यायालय सेवा

    ई न्यायालय सेवा उपयोजक (अँप)

    भारतातील दुययम न्यायालयांतील तसेच बहुतांश उच्च न्यायालयातील प्रकरणांची माहिती देते व दिनदर्शिका, सावधानपत्र (कॅव्हिएट) शोध आणि न्यायालय परिसराचे नकाशावर स्थान या सुविधा पुरविते.

    परतीच्या एस.एम.एस. व्दारे तुमच्या केसची सद्यस्थिती जाणून घ्या
    एस.एम.एस.
    ई न्यायालय 9766899899 या क्रमांकावर पाठवावा