ताज्या बातम्या
जिल्हा न्यायायलयाबद्दल
सिंधुदुर्ग जिल्हा हा कोंकण प्रदेशाचा दक्षिणेकडील भाग असून, तो अरबी समुद्र आणि सहयाद्री पर्वतरांगाच्या मध्ये वसलेला आहे. दिनांक १ मे १९८१ रोजी मुळ रत्नागिरी जिल्हयापासून कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, मालवण, कणकवली व देवगड हे ६ तालुके वेगळे करुन स्वतंत्र सिंधुदुर्ग जिल्हा स्थापन करणेत आला. नंतरचे दोन तालुके म्हणजे वैभववाडी आणि दोडामार्ग हे सिंधुदुर्ग जिल्हयाला जोडले गेले. त्याप्रमाणे सध्या सिंधुदुर्ग जिल्हयात एकुण ८ तालुके आहेत. या जिल्हयाची उत्तर - दक्षिण सरासरी लांबी सुमारे १३० किलोमिटर असून, पूर्व - पश्चिम रुंदी ४० कि.मी. आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयाच्या पूर्वेला कोल्हापूर जिल्हा आहे. उत्तरेला रत्नागिरी जिल्हा आहे, दक्षिणेला गोवा राज्य असून, पश्चिमेला अरबी समुद्र आहे. सिंधुदुर्ग जिल्हयाला १२७ कि.मी. एवढया लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. पूर्वेला सहयाद्री पर्वताच्या रांगा आहेत. या पर्वत रांगेत करुळ, फोंडा, आंबोली व भुईबावडा असे ४ मोठे घाट आहेत.
जिल्हा व सत्र न्यायालय, सिंधुदुर्गची स्थापना दिनांक २७ जानेवारी १९९७ रोजी झाली. ओरोस हे कुडाळ तालुक्यातील मध्यवर्ती गाव असून ते जिल्हा मुख्यालय म्हणून निवडलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्हयाची स्थापना १९८१ साली झाली असली तरी या जिल्हयासाठी स्वतंत्र जिल्हा व सत्र न्यायालय वरील दिनांकापासून सुरु झाले. मुख्यालयाच्या मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा न्यायालय व इतर न्यायालयांसाठी स्वतंत्र सुंदर इमारत बांधणेत आलेली आहे. सदर इमारतीमध्ये ९ स्वतंत्र न्यायालयांसाठी तरतुद करणेत आलेली आहे.
दिनांक २५ जानेवारी १९९७ रोजी नविन[...]
अधिक वाचा
- अधिसूचना – वाहनचालक
- अध्यक्ष, भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वस्थापन प्राधिकरण’ या पदांवरील नियुक्तीसाठी १८.०२.२०२६ रोजीच्या शासकीय पत्राचे प्रकाशन
- पदोन्नतीबाबत अधिसूचना
- बेलिफ पदोन्नतीबाबत अधिसूचना
- जाहीर नोटीस – फोटो कॉपिअर यंत्रबाबत
- जाहिर नोटीस – पॅनेल सदस्य नियुक्त करणेबाबत
- जाहिर नोटीस – Internet Connection 100 MBPS Plan
- जाहिर नोटीस – Internet Connection
- उन्हाळी सुट्टी २०२६ मधील पदभार
- जाहिर सूचना – नविन ईकोर्ट ॲप ४.०
- दिनांक ३१.०३.२०२६ पर्यंत भरावयाची प्रश्नावली
- फिडबॅक प्रश्नावलीची लिंक
- डाऊनटाईमबाबत सूचना
- विविध पोर्टलवरील डाउनटाईमबाबत जाहिर सूचना
- मा. मुख्यन्यायमुर्ती आपत्ती निवारण निधी बाबत सूचना
- दिवाळी सुट्टी २०२५ चे दरम्यान पदभाराबाबत कार्यालयीन आदेश
कोणतीही पोस्ट आढळली नाही
ई- न्यायालय सेवा

प्रकरण सद्यस्थिती

कोर्टाचा आदेश
कोर्टाचा आदेश

वाद सूची
वाद सूची
